नवी मुंबई - वाशी येथील महापालिका रुग्णालयातील 65 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा राज्यातील चौथा बळी आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा चौथा बळी, ६४ वर्षीय महिलेचा नवी मुंबईत मृत्यू
वाशी येथील महापालिका रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या एका महिलेचा मृत्यू 24 मार्च रोजी झाला होता. या महिलेचा कोरोना अहवाल आज आला आहे. या महिलेचा मृत्यू हा कोरोनामुळेच झाल्याची माहिती पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली.
मुंबईतील गोवंडी येथे राहणाऱ्या महिलेवर आजारी असल्यामुळे उपचार सुरू होते. त्यांना नेरूळ येथील डी.वाय.पाटील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना 24 मार्चला वाशी येथील नवी मुंबई महापालिकेच्या रूग्णालयात हलविण्यात आले होते. येथे त्यांचा अवघ्या चार तासातच मृत्यू झाला. पालिका रुग्णालयात दाखल होताच त्यांची कोरोनाची तपासणी करण्यात आली होती. कस्तुरबा रूग्णालयाने दिलेल्या अहवालानुसार या महिलेस कोरोना झाल्याची माहिती नवी मुंबईचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली. अहवाल येण्यापूर्वीच महिलेचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा आकडा आता चारवर पोहोचला आहे.
हेही वाचा -कोरोनाचा संसर्ग होवू नये म्हणून ठाणे पोलिसांनी केला 'हा' उपाय