नवी मुंबई:मंगळवारी संध्याकाळी तळोजा फेस२ सेक्टर ३६ मध्ये सिडकोच्या गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू असताना इमारतीचे बांधकाम सामान वर वाहून नेणारी लिफ्ट कोसळून झालेल्या अपघातात चार मजुरांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे काम हे शिर्के कंपनी करीत आहे. तर मृत्यू झालेले चारही कामगार हे लातूर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. सिडकोच्या माध्यमातून देखील चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे.
Elevator Collapsed in Taloja : तळोजा परिसरात लिफ्ट कोसळून चार कामगार मृत्युमुखी - Four workers were killed
नवी मुंबई परिसरातील तळोजा फेज २ ( Taloja phase 2 ) मध्ये सिडकोच्या गृहनिर्माण काम सुरू असताना बांधकाम सामन वाहून नेणारी लिफ्ट पडून ( an elevator collapsed in Taloja area ) ४ कामगारांचा मृत्यू ( Four workers were killed ) झाल्याची घटना घडली आहे.
बांधकामाचे सामान वर पोहचवणारी लिफ्ट कोसळली, यावेळी दोन कामगार लिफ्ट जवळ उभे होते, व दोन कामगार लिफ्ट खाली येणार अशा ठिकाणी कार मध्ये बसले होते. अचानक ही लिफ्ट कोसळली आणि प्रकाश परसराम पावडे (४८), मारुती केनबा आणेवाड (४०) राजेंद्र गंगाराम रविदास (२२), पंकज भीमराय (२६) हे चौघे मृत्युमुखी पडले. तर जवळपास असणारे आलम साकीरे (२५), मोहम्मद सज्जत अली (२२) हे दोघे जखमी झाले आहेत. अपघातामुळे परीसरात शोककळा पसरली. सिडकोच्या माध्यमातून मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी ७ लाख व जखमींना प्रत्येकी २ लाख देण्याचे निर्देश इमारत बांधकाम करण्याचे कंत्राट घेतलेले कंत्राटदार बी.जी शिर्के यांना दिले आहेत.