ठाणे -एका आमदाराच्या फार्म हाऊसमध्ये एक दोन नव्हे तर चक्क चार भलेमोठे चार अजगर एकत्र घुसल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या चार अजगरांपैकी एक 'मादी' तर तिच्या मागे तीन 'नर' अजगर मिलनासाठी उत्तेजित होऊन फार्म हाऊसमध्ये घुसले होते. मात्र या भल्यामोठ्या चार अजगरांना पाहून येथील कामगारांची भंबेरी उडाली होती. ही घटना कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांच्या कल्याण तालुक्यातील चौरेगाव परिसरातील फार्म हाऊसमध्ये घडली आहे.
चारही अजगारांना रिकाम्या ड्रमच्या साहाय्याने पकडले-
कल्याण तालुक्यातील मामणोली नजीकच्या चौरे गावाच्या परिसरात कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचे प्रशस्त फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसमध्ये गुरुवारी दुपारच्या सुमारास तब्बल ४ अजगर आढळले. त्यामुळे फार्म हाऊसमध्ये उपस्थितांची भंबेरी उडाली. मात्र प्रसंगावधन दाखवत येथील केअरटेकर असलेले चंद्रकांत जोशी यांनी काही सहकाऱ्यांच्या मदतीने या भल्यामोठ्या चारही अजगारांना एक एक करून शिताफीने पकडून रिकाम्या ड्रममध्ये ठेवले. त्यांनतर सर्पमित्र दत्ता बोंबे यांना फोन करून या चारही अजगारांबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र दत्ता बोंबे, न्यानेश्वर सुतार, सिद्धी गुप्ता आणि हितेश करंजवकर यांनी घटनास्थळी पोहचले. त्यांनी चारही अजगरांना ताब्यात घेत, कल्याण वन विभागाचे वनपाल एम.डी.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बाजूच्या वनखात्याच्या जंगलात नैसर्गिक आधिवासात सोडत जीवनदान दिले.
एका मादी मागे घुसले होते तीन नर अजगर-