महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकलची गर्दी बेततेय प्रवाशांच्या जीवावर, मुंब्रा-कळवा मार्गावर चार जण लोकलमधून पडले

या अपघातात दोन पुरुष आणि एका महिला जखमी झाली आहे. महिलेचे नाव नाजिमा शेख असल्याचे समजते. या तिघांवरही कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकलची गर्दी बेततेये प्रवाशांच्या जीवावर

By

Published : Jul 3, 2019, 1:32 PM IST

ठाणे - मुंबई शहर आणि उपनगरात सलग चार दिवस कोसळणारा पाऊस मंगळवारी रात्रीच्या सुमारास ओसरला. यानंतर आज सकाळपासून मध्य रेल्वेची लोकल सेवा सुरू करण्यात आली. सध्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. ही गर्दी प्रवाशांच्या जीवावर बेतत असल्याचे समोर आले आहे. मुंब्रा-कळवा मार्गावर चार प्रवासी ट्रेनमधून पडले आहेत.

या अपघातात दोन पुरुष आणि एका महिला जखमी झाली आहे, तर चौथ्या प्रवाशाचे नाव अद्याप समजलेले नाही. जखमींना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नाजनीन शेख (३६) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर नाजीर शेख आणि निखिलेश कुबल ( २४ ) यांना उपचार करून सोडण्यात आले आहे.

पाऊस ओसरल्यानंतर सुरू करण्यात आलेली लोकल सेवा 20 मिनिटे उशिराने सुरू आहे. परिणामी सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्याही उशिराने धावत आहेत. यामुळे या मार्गावरील सर्वच रेल्वेस्थानकांवर गर्दी दिसून येत आहे.

चाकरमानी गेली 5 दिवस कामावर कमी जास्त प्रमाणात हजर होते. एवढेच नाही, तर मंगळवारी सार्वजनिक सुट्टीदेखील देण्यात आली होती. रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाला असल्याने आज वातावरण ढगाळ असले तरी चाकरमानी कामावर जाण्यासाठी रेल्वे स्थानक गाठत आहे. मात्र, रेल्वेच्या सेवा कमी असल्याने विक्रोळी रेल्वे स्थानक परिसरात ठाण्याच्या दिशेला व सीएसटीएमच्या दिशेने लोकल कमी असल्याने सकाळपासूनच प्रवाशांनी मोठी गर्दी केल्याचे दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details