महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 9, 2019, 5:47 PM IST

ETV Bharat / state

ठाण्यात मुसळधार पावसामुळे झाडे उन्मळून पडल्याने चारजण जखमी

ठाण्यात अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे ठाणे पश्चिम येथील रेल्वे स्थानकाजवळील बस थांब्यावर एक नारळाचे झाड पडले. या दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी झाले. तर दुसऱ्या दुर्घटनेत, ठाणे पश्चिम मधीलच दादोजी कोंडदेव स्टेडियम जवळ एक जुने मोठे झाड पडले. यात दोन जण किरकोळ जखमी झाले.

रस्त्यावरील झाडे हटवताना कर्मचारी

ठाणे- मंगळवारी सायंकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ४ जण जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची स्थिती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती असून त्यांना ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

स्थानिक रहिवाशाची प्रतिक्रिया

अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे ठाणे पश्चिम येथील रेल्वे स्थानकाजवळील बस थांब्यावर एक नारळाचे झाड पडले. या दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी झाले. या प्रवाशांना गंभीर मार लागला असल्याने त्यांना ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

हेही वाचा - 'सत्ताधिकाऱ्यांचा दहशतवाद रोखण्यासाठी गांधी-भगतसिंग कळणे आवश्यक'

दुसऱ्या दुर्घटनेत, ठाणे पश्चिम मधीलच दादोजी कोंडदेव स्टेडियम जवळ एक जुने मोठे झाड पडले. यात दोन जण किरकोळ जखमी झाले. तर काही गाड्यांचे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे दसऱया निमित्त घराबाहेर पडलेले ठाणेकर तसेच देवीची विसर्जन मिरवणूक काढणाऱ्या भाविकाची चांगलीच धावपळ झाली. तर आणखी काही तास असाच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वेध शाळेने वर्तवल्याने ठाणेकर नागरिक चिंतीत झाले आहेत.

हेही वाचा - 'आरे आंदोलनकर्त्यांची ठाणे कारागृहातून सुटका'

ABOUT THE AUTHOR

...view details