महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कारच्या धडकेत दुचाकीवरील चौघेजण गंभीर जखमी - Thane

या अपघातात दुचाकीवरील चौघांचाही उजवा पाय फ्रॅक्चर झाला असून भिवंडीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गणेशपुरी पोलिसांकडून फरार झालेल्या कार चालकाचा शोध सुरु आहे.

अपघातातील जखमी

By

Published : Jul 11, 2019, 11:24 PM IST

ठाणे - भिवंडीहून वज्रेश्वरी येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या दुचाकीला समोरून भरधाव वेगाने आलेल्या कारची समोरून धडक लागून अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील चौघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना अंबाडी-वज्रेश्वरी रोडवरील झिडके गावाच्या हद्दीत घडली.

दीपककुमार रामनवल वर्मा (24), धरमपाल शिवबकास चव्हाण (23), जोगेंद्र सुभेदार राम (22), आणि आकाश सुरेश रावत (24), सर्व राहणार (न्यू आजादनगर, शांतिनगर, भिवंडी) अशी अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत.

हे चौघेही गुरुवारी सायंकाळी दीपककुमार वर्मा यांच्या दुचाकीवरून वज्रेश्वरी येथे देवदर्शनासाठी निघाले होते. झिडके गावच्या हद्दीत आले असताना समोरील वाहनाला ओव्हरटेक करत असताना समोरून अज्ञात झेन कार आल्याने त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेत दुचाकीसह चौघेही रस्त्याच्याकडेला फेकले गेले. अपघातात चौघांचेही उजवे पाय फ्रॅक्चर झाले आहेत, त्यांच्यावर भिवंडीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या अपघात प्रकरणी अज्ञात कार चालकाविरोधात गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघातानंतर फरार झालेल्या कार चालकाचा पोलीस हवालदार शंकर जानकर शोध घेत आहे

ABOUT THE AUTHOR

...view details