ठाणे- शहापूर येथील ६७ वर्षीय व्यक्तीची तपासणी केली असता, पॉझिटिव्ह असल्याचे जिल्हा कार्यालयाने कळविले आहे. या रुग्णाला कोरोनाची लागण कशी झाली, याची माहिती शहापूर तहसीलदार कार्यलय घेत आहे. मात्र आज शहापुरातील भरवस्तीत एक रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कोरोनाचा धसका; शहापुरात पहिलाच कोरोनाग्रस्त रुग्ण आढल्याने खळबळ
शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना ग्रामीण भागात मात्र कोरोनाचा मुरबाड आणि भिवंडी ग्रामीणमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. मात्र आज शहापुरात एक रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली.
जिल्ह्यातील शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना ग्रामीण परिसरात मात्र कोरोनाचा मुरबाड आणि भिवंडी ग्रामीणमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. यापैकी मुरबाडच्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे भिवंडी, शहापूर, मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागात केवळ एकच रुग्ण होता. आज मात्र शहापुरातील भरवस्तीत एक रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे हा रुग्ण भरवस्तीत असलेल्या शहापूर तहसील कार्यालयाशेजारील एका इमारतीत राहत आहे. हा परिसर सील करण्यात आला असून शहापूर नगरपंचायतीने या परिसर निर्जंतुकीकरण केला आहे. या रुग्णावर मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.