महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडीत एकाच दिवशी चार कोरोनाबाधितांचा मृत्यू; तर सोळा नव्या रुग्णांची भर

भिवंडी शहरात शनिवारी एकाच दिवसात कोरोनाचे तब्बल सात नवे रुग्ण आढळले आहेत. या सात रुग्णांपैकी चार रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर ग्रामीण भागात 9 नवे रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण व शहरात 16 नवे रुग्ण आढळले आहेत.

Thane
प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Jun 7, 2020, 5:15 AM IST

ठाणे- भिवंडीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच शनिवारी शहरात एकाच दिवसात कोरोनाचे तब्बल सात नवे रुग्ण आढळले आहेत. या सात रुग्णांपैकी चार रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर ग्रामीण भागात 9 नवे रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण व शहरात 16 नवे रुग्ण आढळले आहेत. या 16 नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 390 वर पोहोचला आहे.

भिवंडी शहरातील सात नव्या रुग्णांपैकी कासमीपुरा, अंजुरफाटा, दांडेकरवाडी येथे तीन नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून धामणकर नाका येथील 49 वर्षीय महिलेचा सायन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर पिराणीपाडा येथील 65 वर्षीय महिलेचा भिवंडीतील आयजीएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तसेच बिलालनगर शांतीनगर परिसरातील 74 वर्षीय वृद्धांचा देखील आयजीएम रुग्णालयात मृत्यू झाला. तर नवी ताडाळी परिसरातील 36 वर्षीय तरुणाचा देखील आयजीएम रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे.

आज आढळलेल्या 7 नव्या रुग्णांमुळे शहरातील बाधित रुग्णांचा आकडा 241 वर पोहोचला आहे. तर 17 रुग्णांचा मृत्यू झालेला असून 96 रुग्ण बरे झाले आहेत. 128 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ग्रामीण भागात देखील आज 9 नवे रुग्ण आढळले असून या 9 नव्या रुग्णांपैकी खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ५, दिवा अंजुर १, पडघा २, तर अनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एक नवा रुग्ण आढळला आहे.

ग्रामीण भागातील या 9 नव्या रुग्णामुळे ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 149 वर पोहोचला असून त्यापैकी 62 रुग्ण बरे झाले असून 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 84 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. भिवंडी शहर व ग्रामीण भागातील एकूण बाधित रुग्णांचा आकडा आता 390 वर पोहोचला असून त्यापैकी 158 रुग्ण बरे झाले आहेत. तर 20 रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या 212 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details