महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चोवीस तासात नवी मुंबईत आढळले 44 कोरोना रुग्ण, एकूण बाधितांची संख्या 495 - नवी मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या

नवी मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. गुरुवारी 271 जणांचे कोरोना अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी, 227 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 44 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

चोवीस तासात नवी मुंबईत आढळले 44 कोरोना रुग्ण
चोवीस तासात नवी मुंबईत आढळले 44 कोरोना रुग्ण

By

Published : May 8, 2020, 9:04 AM IST

ठाणे - अत्यावश्यक सेवेत व एपीएमसी मार्केटमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना व त्यांच्या निकटवर्तीयांना कोरोनाची बाधा होत असल्याचे दिसत आहे. यामुळे पालिका प्रशसनाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.

कोरोनाबाधित रूग्णांची संख्या पाहता नवी मुंबई शहराने धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरात आत्तापर्यंत 495 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून पैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी आहेत. आत्तापर्यंत 5 हजार 401 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 3 हजार 605 जण निगेटिव्ह आले आहेत. तर, 1 हजार 312 जणांचे तपासणी अहवाल येणे प्रलंबित आहे.

सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 484 इतकी आहे. गुरुवारी 271 जणांचे कोरोना अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 227 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 44 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात तुर्भेमधील 7, बेलापूरमधील 3, कोपरखैरणेमधील 9, नेरुळमधील 4, वाशीतील 10, घणसोलीमधील 9, ऐरोलीमधील 1 आणि दिघ्यातील एकाचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details