महाराष्ट्र

maharashtra

भिवंडीत एकाच दिवसात आढळले कोरोनाचे 44 नवे रुग्ण, एकाचा मृत्यू

By

Published : May 31, 2020, 10:22 PM IST

रविवारी शहरात एकाच दिवसात कोरोनाचे तब्बल 28 नवे रुग्ण आढळले आहेत. तर, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय ग्रामीण भागात कोरोनाचे 16 नवे रुग्ण आढळले आहेत. या नव्या 44 रुग्णांमुळे भिवंडीतील कोरोनाबाधितांचा आकडा 253 वर पोहोचला आहे.

corona patients in bhiwandi
भिवंडीत आढळले कोरोनाचे 44 नवे रुग्ण

ठाणे- भिवंडीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी शहरात एकाच दिवसात कोरोनाचे तब्बल 28 नवे रुग्ण आढळले आहेत. तर, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय ग्रामीण भागात कोरोनाचे 16 नवे रुग्ण आढळले आहेत. या नव्या 44 रुग्णांमुळे भिवंडीतील कोरोनाबाधितांचा आकडा 253 वर पोहोचला आहे.

भिवंडी शहरात आज आढळलेल्या रुग्णांमधील सात पुरुष, सहा महिला व दहा मुले हे 23 जण कोरोना रुग्णांच्या संपर्कातील असून उर्वरित पाच रुग्णांमध्ये दोन डॉक्टर, एक पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. यातील तिघे मुंबईवरून आलेले आहेत. या 28 नव्या रुग्णांमुळे शहरातील बाधितांचा आकडा 147 वर पोहोचला आहे. तर 7 रुग्णांचा मृत्यू झालेला असून 63 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 77 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

ग्रामीण भागातदेखील आज सोळा नवे रुग्ण आढळले असून या 16 नव्या रुग्णांपैकी खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चार, दिवा अंजुर चार , कोनगाव चार , दाभाड तीन तर वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एक नवा रुग्ण आढळला आहे. आता या 16 नव्या रुग्णांमुळे ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 106 वर पोहोचला आहे. यातील 51 रुग्ण बरे झाले असून 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 52 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

मागील चार दिवसांपासून लॅब बंद असल्यामुळे रिपोर्ट आलेले नव्हते. त्यामुळे, आज कोरोना रुग्णांची संख्या जास्त आल्याची माहिती मनपा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details