ठाणे :मूळचा रेती व्यवसायिक असलेल्या आणि मालकीची विक्की इंटरप्राइझेसचेचे सर्वेसर्वा संजय भोईर यांनी या व्यापार, व्यवसायातून सर्व्हिस टॅक्सच्या रूपाने २ कोटी २६ लाख रुपयांची रक्कम विविध व्यापाऱ्यांकडून घेतली. मात्र त्याचा भरणा जीएसटी विभागात करण्यात आलेला नाही. सदर प्रकरणात विक्की इंटरप्राइझेसचे २००८ या वर्षात सर्व्हिस टॅक्स नोंदणी केली. त्यानंतर केवळ २०१२-१३ आणि २०१३-१४ या वर्षाचे रिटर्न भरले. मात्र त्यानंतर सलग आठ वर्षाचा भरणाच केला नाही. शासकीय दस्तावेजानुसार आयटी रिटर्न भरले. मात्र सर्व्हिस टॅक्स जमा केला पण भरला नाही. त्यामुळें जीएसटीचे २ कोटी २६ लाख रुपयांचा महसूल बुडविल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात गुरुवारी संजय भोईर यांना अटक करून ठाणे न्यायालयात हजर केले.
जीएसटी प्रशासन मागील काही दिवसांपासून आक्रमक :केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या जीएसटी कर संकलन विभाग मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहे. त्यांनी आतापर्यंतच्या अनेक कोटींच्या कर चुकवेपणावरती आळा घालण्यासाठी कारवाई सुरू केलेली आहे. यामध्ये अनेक राजकीय नेते, मोठमोठे व्यावसायिक यांना देखील कारवाईपासून वाचता आलेले नाही. न्यायालयाने संजय भोईर यांना ९ मार्च २०२३ पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.