महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rebel Corporators : 'त्या' बंडखोर १८ नगरसेवकांवर कारवाई करण्यास काँग्रेसचा विलंब, माजी महापौरांच्या आरोपाने खळबळ - जावेद दळवी

विरोधी पक्षाला मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या बंडखोर 18 नगरसेवकांचे पद रद्द करण्यासाठी 2019 मधील घटनेत तीन वर्षापेक्षा अधिक कालावधी लागल्याचा आरोप जावेद दळवी यांनी केला आहे. या नगरसेवकांबाबत तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे कायदेशीर मार्गाने त्यांचे नगरसेवकपद रद्द होण्यास विलंब झाला असे दळवी यांनी म्हटले आहे. दळवी यांनी केलेल्या आरोपामुळे काँग्रेसच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Rebel Corporators
Rebel Corporators

By

Published : Jun 27, 2023, 6:43 PM IST

जावेद दळवी यांची पत्रकार परिषद

ठाणे : भिवंडी निजामपूर महापालिकेच्या २०१९ साली महापौर पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाला मतदान करणाऱ्या कॉंग्रेसच्या बंडखोर १८ नगरसेवकांवर कारवाई करण्यास विलंब केल्याचा आरोप माजी महापौर जावेद दळवी यांनी केला आहे. तत्कालीन कॉंग्रेसच्या मंत्र्यांसह वरिष्ठ नेत्यांनी दुर्लक्ष केल्याने त्यांचे नगरसवेक पद रद्द करण्यासाठी तीन वर्षापेक्षा अधिक कालावधी लागला, असे दळवी यांनी म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

कॉंग्रेस पक्षाशी गद्दारी :विशेष म्हणजे त्यावेळी महाविकास आघाडीत तत्कालीन महसूल मंत्री म्हणून बाळासाहेब थोरात होते. त्यांचे नाव न घेता त्यांना शक्तिमानची उपाधी देऊन त्यांच्यावर दळवी यांनी निशाणा साधला आहे. शिवाय त्या १८ बंडखोर नगरसवेकांनी पक्षाचा बनावट व्हीप त्यावेळी तयार करून कोणार्क विकास आघाडीच्या महापौर पदाच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांच्या पारड्यात मतदान टाकले होते. ते केवळ आर्थिक देवाणघेवाण, पदासाठी यांनी कॉंग्रेस पक्षाशी गद्दारी केल्याची खरमरीत टीका याचिकाकर्ते तथा कॉग्रेसचे माजी महापौर जावेद दळवी बंडखोरांवर केली आहे.

६ वर्ष निवडणूक लढविण्यास मनाई :महाविकास आघाडी असलेल्या तीन पक्षात कॉंग्रेसही सहभागी होऊन राज्यात सत्ता मिळवली. मात्र, आमची सत्ता राज्यात असतांनाही आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळू शकला नाही. उशिरा का होईना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडोखोर नगसेवकांच्या विरोधात निकाल दिला. तसेच त्यांना ६ वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास मनाई आदेश दिले आहेत. त्या आदेशाने मला खरा न्याय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला असून मी त्यांचा आभारी असल्याचे माजी महापौर दळवी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

कार्यालयाबाहेर जोरदार फटाक्यांची आतिषबाजी :बंडखोर नगसेवकाच्या विरोधात निर्णय आल्याने आज दुपारी भिवंडी शहरातील महापालिका मुख्यालया समोरच असलेल्या कॉंगेस जिल्हा कार्यलयात माजी महापौर दळवी यांनी प्रमुख जिल्हा पदाधिकाऱ्यासह पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यानंतर आनंद उत्सव साजरा करत कार्यलयाबाहेर जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊन नागरिकांना पेढे वाटप करण्यात आले.

हेही वाचा -Narendra Modi on Sharad Pawar : 'शरद पवारांच्या मुलीचे भले करायचे असेल तर.... '; मोदींचा पवार कुटुंबीयांवर हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details