ठाणे- गृहनिर्माण मंत्री पदभार सांभाळताच एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे आधीच्या सरकारने सरकारी योजनेत घर बांधणाऱ्या विकासकाला विकण्यासाठी वेगळी घरे आणि सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्यांकरिता वेगळी घरे, असा दुजाभाव केला होता. ज्यात विकासकाचा फायदा होता. पण, आता तसे होणार नाही. सगळी घरे समान वाटपात जातील, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
आधीच्या सरकारने व्यावसायिकांच्या फायद्यासाठी राबविले घरांचे धोरण - जितेंद्र आव्हाड - jitendra awhad latest
पुढच्या काही दिवसात १० हजार सरकारी घरांचे वाटप केले जाणार आहे. त्यातील १ हजार घरे पोलीस आणि १ हजार घरे सरकारी तथा निम सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.
पुढच्या काही दिवसात १० हजार सरकारी घरांचे वाटप केले जाणार आहे. त्यातील १ हजार घरे पोलीस आणि १ हजार घरे सरकारी तथा निम सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. आणि येत्या काळात ५ लाख घरे मुंबई आणि उपनगरात अपेक्षित आहेत. त्यात ठाणे, शिरढोण, कल्याण, पलावा येथे घरे बांधली जाणार आसून या ५ लाख घरांपैकी १ लाख घरे म्हणजेच ५० हजार घरे पोलिसांना आणि ५० हजार घरे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना दिली जाणार, असा निर्णय शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
हेही वाचा-अकरावीच्या विद्यार्थ्याचा झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, हत्या की आत्महत्या?