महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खळबळजनक..! परदेशातील नागरिकांना मशिदीत ठेवल लपवून; मौलाना, ट्रस्टींवर गुन्हे दाखल - कोरोना विषाणू

ठाण्यातील मुंब्रा भागातील एका मशिदीतून 14 बांग्लादेशी आणि 2 आसामी तर दुसऱ्या अन्य एका मशिदीतून 8 मलेशियन लोकांना पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले आहे. त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यातील काही जण 10 मार्चला दिल्लीच्या निजामुद्दीन येथून आले होते.

Thane
परदेशातील नागरिकांना मशिदीत ठेवल लपवून

By

Published : Apr 3, 2020, 12:39 PM IST

ठाणे- कोरोनाच्या संकटाचा विळखा लक्षात घेता केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळता यावी म्हणून सरकारने हे पाऊल उचललं आहे. मात्र, अशाताच ठाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परदेशातील नागरिकांना मशिदीमध्ये लपवून ठेवल्याचे उघड झाले आहे.

मुंब्रातील अल नदिउल फला या शाळेच्या 4 ट्रास्टिंवर 8 परकीय नागरिक व 2 भारतीय नागरिकांना कोणतीही परवानगी न घेता मशिदीत ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तन्वीय उल उलूल मदर्सच्या ट्रस्टींवर देखील 13 परकीय नागरीकांना मशिदीत ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर राबोडीतील एका मजिदमध्ये वसई येथून आलेल्या 13 जणांवर राबोडी पोलिसांनी कारवाई केली आहे. मनाई आदेश धुडकवल्या प्रकरणी या सगळ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना जामीन मंजूर झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ठाण्यातील मुंब्रा भागातील एका मशिदीतून 14 बांग्लादेशी आणि 2 आसामी तर दुसऱ्या अन्य एका मशिदीतून 8 मलेशियन लोकांना पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले आहे. त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यातील काही जण 10 मार्चला दिल्लीच्या निजामुद्दीन येथून आले होते. परंतु, सुदैवाची गोष्ट म्हणजे निजामुद्दीनच्या कार्यक्रमाशी या लोकांचा काहीही संबंध आला नाही, असे पोलीस चौकशीत उघड झाले आहे. या सर्व लोकांचे रिपोर्ट तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याचीही माहिती पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिली.

तर दिल्लीच्या धार्मिक कार्यक्रमातून आलेल्या 25 लोकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याची माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. गुरुवारी राबोडी येथील एका मशिदीमध्ये वसई येथून 13 जण आल्याची माहिती राबोडी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सदर ठिकाणी तपासणी केली असता, 13 जण मिळून आले. या सगळ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करून त्यांना परत पाठवण्यात आले. या दोन्ही घटनांमुळे पोलीस सतर्क झाले असून बाहेरून येणाऱ्या वाहनांवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details