ठाणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरून मोदी सरकारवर केलेल्या टीकेनंतर भाजपने त्यांना जय श्री राम लिहून दहा लाख पत्रे पाठवण्याची घोषणा केली होती. त्या पार्शवभूमीवर भिवंडी शहरातील विद्याश्रम पोष्ट कार्यालयात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जय श्री रामच्या घोषणा देत पाच हजार पत्रे पोष्ट पेटीत टाकून शरद पवारांविरोधात घोषणाबाजी करत आपला निषेध व्यक्त केला आहे.
भिवंडीतून 'जय श्री राम' लिहिलेली ५ हजार पत्रे शरद पवारांना रवाना ...
भिवंडी शहरातील विद्याश्रम पोष्ट कार्यालयात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जय श्री रामच्या घोषणा देत पाच हजार पत्रे पोष्ट पेटीत टाकून शरद पवारांच्याविरोधात घोषणाबाजी करीत आपला निषेध व्यक्त केला आहे.
शरद पवारांनी राम मंदिर भूमीपुजनामुळे कोरोना जाणार आहे का? असा सवाल उपस्थित केला होता. त्यांनतर भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आरोपप्रत्यारोपाचा कलगीतुरा रंगला असता त्याचा निषेध भाजपा जनता युवा मोर्चा कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. आज भाजप युवा मोर्चा भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष विशाल पाठारे यांच्या नेतृत्वाखाली जय श्री राम लिहलेली 5,000 पत्रे शरद पवार यांच्या मुंबई सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोष्टामार्फत रवाना केली असून भिवंडी शहरातील विद्याश्रम पोष्ट कार्यालयात कार्यकर्त्यांनी जय श्री रामच्या घोषणा देत ही पत्रे पोष्ट पेटीत टाकून आपला निषेधही व्यक्त केला आहे.
दरम्यान, अयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिर निर्माणाचा शुभारंभ ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यावर खासदार शरद पवार यांनी केलेल्या विधानावर भाजपा युवा मोर्चाच्यावतीने पवारांना जय श्री राम लिहिलेली 10 लाख पत्र त्यांच्या मुंबईस्थित सिल्व्हर ओक निवासस्थानी पाठवण्यास कार्यकत्यांनी सुरवात केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपाला प्रत्युत्तर देण्याची तयारी केली असून छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा लिहून राष्ट्रवादी काँग्रेस मोदींना २० लाख पत्रे पाठवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे केंद्रातील भाजप सत्ताधारी आणि राज्यातील सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीमध्ये कोरोनाच्या महामारीत आता पत्र युद्ध रंगले आहे.