फेरीवाल्यांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा; हफ्ते घेतानाचा व्हिडिओ व्हायरल - फेरीवाल्याकडून खंडणी घेतल्याप्रकरणी गुन्हा
आठवडी बाजारातून फेरीवाल्यांकडून हप्ता उकळल्याप्रकरणी फेरीवाल्यानी दिलेल्या तक्रारीनुसार मानपाडा पोलीस ठाण्यात संजय सिंग, नरेश, रोहन, मामा यांच्यासह माजी नगरसेवक कुणाल पाटील अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी व्हिडिओत पैसे घेताना दिसत असलेल्या संजय सिंग याला अटक करत पुढील तपास सुरू केला आहे.
ठाणे -आठवडी बाजारातून फेरीवाल्यांकडून हप्ता उकळल्याप्रकरणी फेरीवाल्यानी दिलेल्या तक्रारीनुसार मानपाडा पोलीस ठाण्यात संजय सिंग, नरेश, रोहन, मामा यांच्यासह माजी नगरसेवक कुणाल पाटील अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी व्हिडिओत पैसे घेताना दिसत असलेल्या संजय सिंग याला अटक करत पुढील तपास सुरू केला आहे.
प्रत्येकी 100 ते 200 रुपये हप्ता वसूल -
कल्याण पूर्व भागातील आडीवली परिसरात आठवडा बाजार भरवला जातो. कोविडच्या काळात आठवडी बाजार बंद असताना या परिसरात मोठय़ा प्रमाणात फेरीवाले बसतात. या फेरीवाल्यांना धंदा लावण्यासाठी प्रत्येकी 100 ते 200 रुपये हप्ता वसूल केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याचा व्हिडिओसुद्धा समोर आला आहे. या व्हिडियोत एक व्यक्ती फेरीवाल्यांकडून पैसे वसुली करताना दिसत आहे.