महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकरी आंदोलन : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही बाजार बंद; एपीएमसी परिसरात शुकशुकाट - नवी मुंबई भारत बंद न्यूज

कृषी व पणन कायद्याविरोधात आज 'भारत बंद'ची हाक देण्यात आली आहे. 'केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे, व्यापारी व माथाडी कामगारांवर बेकारीचे संकट ओढावणार आहे,' असे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. या भूमिकेसह नवी मुंबई वाशी येथील एपीएमसीच्या पाचही बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई शेतकरी आंदोलन न्यूज
नवी मुंबई शेतकरी आंदोलन न्यूज

By

Published : Dec 8, 2020, 10:53 AM IST

Updated : Dec 8, 2020, 11:47 AM IST

नवी मुंबई -केंद्र सरकारने आणलेल्या कृषी व पणन कायद्याविरोधात देशभरातील विरोधकांनी तीव्र भूमिका घेतली आहे. या कायद्याविरोधात आज 'भारत बंद'ची हाक देण्यात आली आहे. या कायद्याच्या विरोधात देशभरात अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे. या संपात एपीएमसीच्या सर्व बाजारपेठा सहभागी झाल्या असून आज मार्केट परिसरातील, पाचही बाजारपेठा बंद ठेवण्यामुळे एपीएमसी परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही बाजार बंद

हेही वाचा -शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरावे- राधाकृष्ण विखे पाटील


'केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे, व्यापारी व माथाडी कामगारांवर बेकारीचे संकट ओढावणार आहे,' असे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. तसेच, आज शेतकऱ्यांसह नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी, माथाडी मापाडी, तसेच इतर घटकांनी आंदोलनात सहभागी असल्याचे म्हटले आहे. या कायद्याला विरोध करण्यासाठी आज देशव्यापी संपाची हाक दिली आहे. दररोज सकाळी पहाटे 3 वाजता वाशी येथील एपीएमसी मार्केट परिसरात व्यवहार सुरू होतात. दररोज लाखो रुपयांची उलाढाल या मार्केटमध्ये होत असते, राज्य परराज्यातून फळे भाज्या, कांदे बटाटे यांच्या गाड्या येतात. मात्र, आज देशव्यापी आंदोलनाला पाठिंबा देताना एपीएमसी परिसरात संपूर्ण बंद पाळण्यात आला आहे. पाचही बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत व सर्व व्यवहार आज ठप्प करण्यात आले आहेत.

'माथाडी कामगार मेहनतीचे काम करतात. केंद्र सरकारने केलेल्या कृषी व पणन कायद्यातील बदल व नवीन कायद्यामुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर गदा येणार आहे. तसेच, माथाडी कामगारांचा रोजगार हिरावला जाणार आहे. या कायद्यामुळे सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे होणार आहे,' अशी भूमिका मांडत नवी मुंबई वाशी येथील एपीएमसीच्या पाचही बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा -जिल्ह्यात भारत बंदला सकाळच्या वेळेत अल्प प्रतिसाद

Last Updated : Dec 8, 2020, 11:47 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details