ठाणे- कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी अतिरिक्त कुमक म्हणून ठाणे शहर व ग्रामीण पोलीस दलासोबत होमगार्डच्या सदस्यांचे पाचारण करण्यात आले होते. आता तब्बल 38 दिवसांची सेवा बजावल्यानंतर या सर्व होमगार्ड्सची सेवा 3 मेपासून स्थगित करण्याचे आदेश जिल्हा समादेशक यांनी दिले आहेत. होमगार्डच्या सेवा स्थगितीबाबतच्या वृत्ताला पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दुजोरा दिला आहे.
कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या पाचशे होमगार्डची सेवा स्थगित, ३८ दिवस होते बंदोबस्तावर - corona in thane
ठाणे शहर पोलीस दलातील 7 ते 8 हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी ठाणे, भिवंडी, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. यातील 60 हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे कोरोना बंदोबस्तासाठी 500 होमगार्ड 27 मार्चपासून रुजू केले होते.
कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या पाचशे होमगार्डची सेवा स्थगित
ठाणे शहर पोलीस दलातील 7 ते 8 हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी ठाणे, भिवंडी, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. यातील 60 हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे कोरोना बंदोबस्तासाठी 500 होमगार्ड 27 मार्चपासून रुजू केले होते. कर्तव्यावर हजर झालेल्या या होमगार्ड्सचे मानधन जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन निधीतून देण्यात येणार आहे.
Last Updated : May 4, 2020, 10:38 AM IST