ठाणे- उल्हासनगर कॅम्प क्रमांक २ येथे धोकादायक असलेली ५ मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. मात्र, अग्निशामक दल व महापालिका प्रशासनाने इमारतीमधील रहिवाशांना रविवारी सायंकाळच्या सुमारास स्थलांतरित केले होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
उल्हासनगरमध्ये ५ मजली इमारत कोसळली, घटनेच्या काही तासांपूर्वीच रहिवाशांना काढले होते बाहेर - इमारत कोसळली उल्हासनगर
गेल्या १५ वर्षांपूर्वी उल्हासनगर कॅम्प क्रमांक २ मधील मेहक ही ५ मजली इमारत उभारण्यात आली होती. या इमारतीमध्ये सुमारे ३१ कुटूंब राहत होती. या इमारतीमधील काही पिलरला मोठे तडे गेले होते. त्यामुळे या इमारतीचा तोल एका बाजूला गेला होता. या इमारतीमधील रहिवाशांना बाहेर काढल्यानंतर इमारत कोसळली.
गेल्या १५ वर्षांपूर्वी उल्हासनगर कॅम्प क्रमांक २ मधील मेहक ही ५ मजली इमारत उभारण्यात आली होती. या इमारतीमध्ये सुमारे ३१ कुटुंब राहत होती. या इमारतीमधील काही पिलरला मोठे तडे गेले होते. त्यामुळे या इमारतीचा तोल एका बाजूला गेला होता. या घटनेची माहिती मिळताच अग्निमशमन दलासह उल्हासनगर महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या इमारतीमधील रहिवाशांचे दुसरीकडे स्थलांतर केले. मात्र, त्यांचे संसार उपयोगी मौल्यवान वस्तू काढण्यालाठी आज सकाळच्या सुमारास काही रहिवासी आले होते. त्यावेळी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही इमारत कोसळली. मात्र, सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या इमारतीलगत असलेल्या ३ ते ४ इमारतींना देखील धोका पोहोचला आहे. त्याही इमारतीमधील रहिवाशांना दुसरीकडे स्थलांतरित करण्याचे प्रयत्न पालिका प्रशासनाने सुरू केले आहे.
इमारत कोसळल्यानंतर पालिका आयुक्त सुधाकर देशमुख, सहायक पोलीस आयुक्त धुळा टेळे, पालिकेच्या सहायक आयुक्त गणेश शिंपी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुराडकर घटनास्थळी पोहोचले. इमारतीच्या मातीचा ढिगारा युद्धपातळीवर हटवण्याचे आदेश संबंधित विभागाल दिले. तसेच शेजारच्या इमारतींची पाहणी केली. दरम्यान, उल्हासनगर महापालिका क्षेत्रामधील शेकडो इमारती धोकादायक आणि अतिधोकादायक अवस्थेत आहेत. या इमारतीवरही लवकरात लवकर कारवाई करावी. तसेच नागरिकांची जीवित आणि वित्तहानी टाळावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.