ठाणे-मीरा भाईंदर महानगरपालिका परिसरातील मुंबई- अहमदाबाद हायवेवरील प्रसिध्द असलेले फाउंटन हॉटेल पालिकेकडून सील करण्यात आले आहे. या हॉटेलमध्ये पाच कोरोना रुग्ण सापडल्याने पालिकेकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
फाउंटन हॉटेलमध्ये सापडले पाच कोरोना रुग्ण; पालिकेकडून हॉटेल सील - मीरा भाईंदर, फाउंटन हॉटेल सील न्यूज
मीरा भाईंदर शहरातील अनेक ठिकाणी विना माक्स नागरिक वावरताना दिसत आहे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. शहरातील प्रमुख हॉटेलमध्ये देखील कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही.
![फाउंटन हॉटेलमध्ये सापडले पाच कोरोना रुग्ण; पालिकेकडून हॉटेल सील फाउंटन हॉटेल](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10786902-83-10786902-1614338566000.jpg)
नियमाचे उल्लंघन, प्रशासन सुस्त
मीरा भाईंदर शहरातील अनेक ठिकाणी विना माक्स नागरिक वावरताना दिसत आहे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. शहरातील प्रमुख हॉटेलमध्ये देखील कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. हॉटेलमधील कर्मचारी विना माक्स फिरताना दिसतात. तसेच हॉटेलमध्ये सेनेटयाझरची व्यवस्थादेखील नाही. त्यामुळे मीरा भाईंदर शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोना रूग्णांची संख्या कमी झाल्यानंतर प्रशासन झोपी गेले आहे का? असा प्रश्न सामान्य माणूस विचारत आहे.