महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात व्यापाऱ्याकडून 3 लाखाची खंडणी मागणारे पाचजण अटकेत - खंडणी खोर

व्यापाऱ्याकडून जीवे ठार मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी पाच खंडणीखोरांच्या मानपाडा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

मानपाडा पोलीस ठाणे

By

Published : Sep 29, 2019, 9:19 PM IST

Updated : Sep 29, 2019, 11:22 PM IST

ठाणे- एका व्यापाऱ्याकडे ३ लाखांची खंडणीची मागणी करत पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या गावगुंडांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी राहुल पाटीलसह पाच आरोपींना अटक केली आहे.

मानपाडा पोलीस ठाणे

कल्याण-शीळ मार्गावरील टाटा नाका परिसरात स्टीलचा व्यवसाय करणारे व्यापारी उमेश मिश्रा यांना एक महिन्यापासून स्थानिक गावगुंड त्रास देत होते. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला राहुल पाटील त्यांच्याकडून ३ लाख रुपयांची मागणी करत होता. पैसे देण्यास नकार दिल्याने राहुल हा वारंवार मिश्रा यांच्या ऑफिसवर गुंड पाठवत होता. लवकर पैसे दिले नाही तर तुला ठार मारणार, अशी धमकी मिश्रा यांना राहुल आणि त्याच्या साथीदारांनी यांनी दिली होती. अखेर मिश्रा यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर मानपाडा पोलिसांनी राहुल पाटीलसह पाच आरोपींना अटक केली आहे.

हेही वाचा - भिवंडीत अल्पवयीन मुला-मुलीचे अपहरण; पालकवर्गात भीती

Last Updated : Sep 29, 2019, 11:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details