महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रेमप्रकरणातून वाशी खाडीत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, कोळी बांधवानी वाचवले प्राण - तरुणाचा वाशी खाडीत आत्महत्येचा प्रयत्न

प्रेेयशीच्या झालेल्या किरकोळ वादातून तरुणाने वाशी खाडीपुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक मच्छिमारांनी या तरुणाचे प्राण वाचविले.

young man who tried to commit suicide
young man who tried to commit suicide

By

Published : Jan 27, 2021, 3:09 PM IST

नवी मुंबई - नवी मुंबईतील वाशी खाडी पूल मुंबई लेन येथे एका तरुणाने वाशी खाडीपुलावरून पाण्यामध्ये उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र कोळी बांधवांच्या सतर्कतेने या तरुणाचा जीव वाचविण्यात यश आले आहे.

प्रेयसीशी झालेल्या किरकोळ वादातून आत्महत्येचा प्रयत्न -

संबंधित तरुणाचे नाव रवी पप्पू रेड्डी असून, रवी आणि प्रेयसीमध्ये झालेल्या किरकोळ वादातून रवीने वाशी खाडीपूलावरुन पाण्यात उडी मारली.

प्रेमप्रकरणातून वाशी खाडीत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
उडी मारल्याचे पाहताच प्रेयसीचा आरडाओरडा -रवी याने खाडीत उडी मारल्याचे पाहताच त्याची प्रेयसीने आरडाओरडा केला असता तात्काळ स्थानिक मच्छीमार महेश अशोक सुतार व त्यांचा मित्र अभिषेक जैस्वाल हे वाशी खाडी पूल येथे तत्काळ आले व मच्छीमार महेश सुतार व अविनाश जैस्वाल यांनी बोटीने उडी मारलेल्या तरुणाचा शोध घेत असताना हा तरुण पाण्यामध्ये बुडताना दिसुन आला त्याला पाण्यातुन सुखरूप बाहेर काढून त्याचा जीव या कोळी बांधवाच्या सतर्कतेने वाचला आहे. त्यानंतर संबंधित तरुण व त्याची प्रेयसी गायत्री चौहान यांना वाशी पोलीस ठाण्यात आणून त्यांचे समुपदेशन करून त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details