महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात आढळला म्युकरमायकोसिसचा पहिला रुग्ण - म्युकरमायकोसिसचा पहिला रुग्ण

आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ करणारी घटना ही ठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली आहे. म्यूकरमायकोसिस या दुर्मीळ, पण अत्यंत घातक संसर्ग असलेल्या रोगाचा पहिला रुग्ण आढळला आहे. एका ५६ वर्षीय महिलेला म्युकरमायकोसिस असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक डाॅक्टर शुभांगी अंबाडेकर यांनी स्पष्ट केले आहे. महिलेच्या उजव्या डोळ्यावर प्रकाश टाकल्यानंतरही डोळ्याची कोणतीच हालचाल होत नसून तीचा डोळा निकामी झाला आहे.

mucormycosis infarction case in Thane
ठाण्यात म्युकरमायकोसिसचा पहिला रुग्ण

By

Published : May 11, 2021, 8:53 AM IST

ठाणे -कोरोनाबाधित रुग्णांमध्ये आता एका नवीन आजाराची लक्षणे दिसून येतात, ज्याला म्युकरमायकोसिस असे म्हटले गेले आहे. ही लक्षणे असलेला पहिला रुग्ण ठाणे जिल्ह्यात ठाण्यात आढळला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी झाल्यास असे प्रकार रुग्णांसोबत घडू शकतात, याची फक्त चर्चा होती. ठाण्यात पहिला रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाच्या चिंतेत आता वाढ झाली आहे.

ठाण्यात म्युकरमायकोसिसचा पहिला रुग्ण

विविध चाचण्यांतून आले लक्षात -

ठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात ही चिंता वाढवणारी घटना घडली आहे. एका ५६ वर्षीय महिले सोबत हे घडलंय, या महिलेला कोरोना झाला होता. मात्र याच दरम्यान त्या महिलेची रोग प्रतिकारशक्ती कमालीची कमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांचा अहवालानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डाॅक्टर शुभांगी अंबाडेकर यांनी महिलेची तपासणी केली. त्यात महिलेची डोळेवर आलेले दिसून आले तर उजव्या डोळ्याची हालचाल होत नसल्याचे तपासणी दरम्यान लक्षात आले, महिलेच्या उजव्या डोळ्यावर प्रकाश टाकल्यानंतरही डोळ्याची कोणतीच हालचाल होत नव्हती, तर महिलेच्या सिटीस्कॅन, ओर्बिट ब्रेन सिटी स्कॅन चाचणी अहवालात देखील अनेक लक्षणे आढळून आले. उजव्या डोळ्याच्या मासपेशींना सूज आली होती. तसेच इतरही अंतर्गत लक्षणे वैद्यकीय चाचणी अहवालात दिसून आले. ही सर्व लक्षणे म्युकरमायकोसिस या आजाराची आहेत. या आधारावर महिलेला म्युकरमायकोसिस असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या डाॅक्टरांनी स्पष्ट केले आहे.

रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने त्यांच्यात म्यूकरमायकोसिस -

ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून त्यात कोरोनाचे स्ट्रेन देखील बदलत आहे. यानुसार काही जिल्ह्यांमध्ये कोरोना या आजारात रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने त्यांच्यात म्यूकरमायकोसिस नावाचा आजार आढळून येत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन त्याचा थेट परिणाम डोळ्यांवर होत आहे. यात रुग्णांचे डोळे निकामी होत असल्याचे काही प्रकार समोर आले आहेत.

डॉक्टरांना शंका जीवघेणी लक्षणे -

म्यूकरमायकोसिस नावाचा बुरशीपासून होणारा दुर्मीळ, पण अत्यंत घातक संसर्ग आहे. त्यातून डोळा गमविल्याची प्रकरणे मात्र नवीनच आहेत. हा आजार होण्याचे प्रमुख कारण म्हणजे कोरोनाकाळात कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती. या आजाराचे सायनसमधून संक्रमण सुरू होते. पुढे ते तोंडाच्या आतून वरचा जबडा, डोळा आणि मेंदूपर्यंत पोहोचते. ज्यामुळे पापणीला सूज येते, पापणी जड होते, डोळे पुढे येतात, डोळ्यांभोवतीची त्वचा काळपट होते, डोळ्यांची हालचाल मंदावते, धुरकट दिसू लागते, नाकावर सूज, नाक चोंदते, चेहऱ्यावर एका बाजूने सूज येते, डोळ्यांमध्ये वेदना होतात. म्यूकरमायकोसिस हा काळ्या बुरशी सारखा असतो. तो केवळ डोळ्यांमध्ये नाही तर, मेंदू, हिरड्यांमध्ये तसेच छातीत देखील होवू शकतो, यामुळे डोळा कायमचा निकामी होतो. शिवाय पॅरालिसिस आणि मृत्यूही यात ओढावण्याची शक्यता आहे असं तज्ञांचे म्हणणे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details