दिव्यांग कोरोनाबाधित रुग्णांची व्यवस्था करणारे महाराष्ट्रातील 'हे' आहे पहिले रुग्णालय
दिव्यांग व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्यास त्यांना योग्य उपचार मिळावे, त्यांना सोयीस्कर वाटेल अशी व्यवस्था रुग्णालयात मिळावी, यासाठी नवी मुंबई मनपाच्या सूचनेनुसार सीवूड येथील न्यूरोजेन ब्रेन अँड स्पाईन इन्स्टिट्यूटने पुढाकार घेत आपल्या रुग्णालयात कोरोनाबाधित दिव्यांग रुग्णांकरता विशेष सोय उपलब्ध केली आहे. रुग्णालयात 25 बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोरोनाबाधित दिव्यांगांची व्यवस्था करणारे महाराष्ट्रातील 'हे' आहे पहिले रुग्णालय
नवी मुंबई -शहर आणि परिसरात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात सगळ्यात जास्त फरफट दिव्यांग व्यक्तींना कोरोना झाल्यावर होत आहे. दिव्यांग कोरोनाबाधीत रुग्णांची योग्यरितीने सोय व्हावी म्हणून कोरोनाबाधित दिव्यांग रुग्णांकरता नवी मुंबईत विशेष सोय उपलब्ध करण्यात आली आहे. दिव्यांग कोरोनाबाधीत रूग्णांची सोय करणारी नवी मुंबई पहिली महानगरपालिका ठरली आहे.
Last Updated : Jun 9, 2020, 8:12 PM IST