ठाणे - भिवंडीत कोरोना संकट आटोक्यात आले असले तरी म्युकरमायकोसिस आजाराने डोके वर काढले असून भिवंडी महापालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्याचा म्युकरमायकोसिस आजाराने मंगळवारी रात्री मृत्यू झाला. कोरोना संकटात कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्याचाच म्युकरमायकोसिस आजाराने मृत्यू झाल्याने मनपा कर्मचाऱ्यांसह, परिवार व परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून भिवंडीत म्युकरमायकोसिस आजाराचा हा पहिलाच बळी असल्याचे समोर आले आहे. भिवंडी मनपा म्युकरमायकोसिस आजाराबाबत आता तरी खबरदारी घेणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे. दिपीका दिनेश घाडगे (वय ४४ वर्ष) असे म्युकरमायकोसिस आजाराने मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून त्या भिवंडी महापालिकेत प्रभाग पाचमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत होत्या.
चार दिवसांपूर्वी म्युकरमायकोसिस आजाराची लक्षणे..
भिवंडीत म्यूकरमायकोसिसचा पहिला बळी; काळ्या बुरशीने महिला सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू
भिवंडी महापालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्याचा म्युकरमायकोसिस आजाराने मंगळवारी रात्री मृत्यू झाला. कोरोना संकटात कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्याचाच म्युकरमायकोसिस आजाराने मृत्यू झाल्याने मनपा कर्मचाऱ्यांसह, परिवार व परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून भिवंडीत म्युकरमायकोसिस आजाराचा हा पहिलाच बळी असल्याचे समोर आले आहे.
मृत दीपिका मागील चार दिवसांपूर्वी त्यांना म्युकरमायकोसिस आजाराची लक्षणे आढळल्याने त्यांना सुरुवातीला ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांनतर पुढील उपचारासाठी मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील सेंट जोर्जेस रुग्णालयात हलविण्यात आले होते. याठिकाणी उपचार सुरु असताना मंगळवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले एक मुलगी व वृद्ध सासू असा परिवार आहे.
उपचारासाठी उपाययोजना कारणार का ?
राज्यासह जिल्ह्यात म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण वाढले असतांनाही भिवंडी महापालिका क्षेत्रात म्युकरमायकोसीस आजाराचे रुग्ण नव्हते. यापूर्वी म्युकरमायकोसिस या आजाराचा फक्त एकच रुग्ण आढळला असल्याची माहिती मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. आर. खरात यांनी दिली आहे. तर दुसरीकडे मनपाच्या महिला सफाई कर्मचाऱ्याच्या मृत्यू नंतर तरी भिवंडी मनपा म्युकरमायकोसिस आजारावरील उपचारासाठी उपाययोजना कारणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे.