ठाणे- मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास शिळ फाटा येथे खान कंपाउंड मधील गोडाऊनला आग लागली. काही गोडाऊनमध्ये प्लास्टिक आणि भंगार होते. त्यामुळे आगीने मोठा पेट घेतला. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनचे पथक आणि ठाणे अग्नीशमन दल प्रयत्न करत होते.
ठाणे : शिळ फाटा येथे आगीत 13 गोडाऊन जळून खाक - शिळफाटा
मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास शिळ फाटा येथे खान कंपाउंड मधील गोडाऊनला आग लागली. यामध्ये 13 गोडाऊन जळून खाक झाले आहेत.
![ठाणे : शिळ फाटा येथे आगीत 13 गोडाऊन जळून खाक गोडाउनमध्ये लागलेली आग](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5620536-thumbnail-3x2-fire.jpg)
गोडाउनमध्ये लागलेली आग
गोडाउनमध्ये लागलेली आग
या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. या घटनेत 13 गोडाऊन जळून खाक झाले. 3 अग्नीशमन बंब, दोन बचाव वाहन, तीन पाण्याचे टँकर, दोन पाण्याच्या मोठ्या टँकरच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते.
हेही वाचा - कोट्यवधींचा खर्च करूनही गाव तहानलेलेच ! पायपीट करीत भागवितात तहान
Last Updated : Jan 7, 2020, 7:54 AM IST