ठाणे- डोंबिवली एमआयडीसीच्या फेज २ परिसरातील कल्याण-शिळ रस्त्यावर असलेल्या नेकणीपाडा बस स्टॉप जवळच्या कचऱ्याला रविवारी दुपारी तीनच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीची झळ झोपड्यांसह झाडांनाही बसली. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली.
एकीकडे डोंबिवली औद्योगिक परिसरातील कारखान्यांमुळे प्रदूषण होत असतानाच आजच्या घटनेमुळे प्रदुषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी औद्योगिक परिसरातील कारखान्यांमुळे प्रदूषण होत नसल्याचा दावा करून कामा संघटनेने डोंबिवलीकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला होता. डोंबिवलीचे भोपाळ होईल की काय, या भीतीने स्थानिक संतप्त झाले आहेत. आसपासच्या कंपन्यांसह भंगारवाले याच परिसरात कचरा आणून टाकतात. साठत गेलेल्या या कचऱ्याला कुणीतरी आग लावल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. झोपड्यांसह कचरा आणि केबलचे बंडल्स पेटल्यानंतर परिसरात धुराचे प्रचंड लोळ उठले होते. यामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला होता. ही आग लागली की लावली याचे अग्निशमन दलाला स्पष्टीकरण देता आले नाही.
हेही वाचा -तुमच्यात हिंमत असेल तर लावा नवीन निवडणूक; तुम्ही तिघे आम्ही एकटे
आग लावूनच कचऱ्याची विल्हेवाट