ठाणे : कल्याण-आंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान वडवली गावातील बाळकृष्ण पेपर मिलमधील रद्दीच्या गठ्ठ्यांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीने काही क्षणात रौद्ररूप धारण केले होते. कंपनीतील कामगारांनी परिस्थिती लक्षात घेता बाहेर पळ काढल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. तब्बल चार तासानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
कल्याणनजीक बाळकृष्ण पेपर मिलमधील रद्दीच्या गठ्ठ्यांना भीषण आग हेही वाचा -राजू शेट्टी म्हणतात... तर अर्थसंकल्पाबाबत अधिक आनंद झाला असता
कल्याणनजीक बाळकृष्ण पेपर मिलमध्ये रद्दीचा बॉयलरमध्ये लगदा करून त्यापासून नवीन पेपर बनविण्यात येतात. साडेबारा वाजताच्या दरम्यान रद्दीच्या गठ्ठ्यांना अचानक आग लागली. गेल्या चार तासापासून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कल्याण, उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत होते. आता मात्र, ही आग आटोक्यात आली आहे. आग कशामुळे लागली याची माहिती समजू शकली नाही. तर दुसरीकडे रद्दीच्या गठ्ठ्यांची आग कंपनीत इतर ठिकाणी पसरू नये म्हणून जेसीबीच्या साह्याने रद्दीचे गठ्ठे बाजूला करण्यात आले आहेत.
हेही वाचा -अर्थसंकल्पाचा महा'अर्थ'- केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या करात घट