नवी मुंबई-पनवेलमहापालिका क्षेत्रात व येणाऱ्या धानसर गाव परिसरात असलेल्या एका गोदमाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न अग्नीशमन विभागाकडून सुरू आहेत.
शॉर्टसर्किटमुळे लागली आग
रायगड व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या व पनवेल महापालिका क्षेत्रात येणाऱ्या धानसर गावात असणाऱ्या भंगारच्या गोदमाला आग लागली आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.