ठाणे : उल्हासनगरमधील प्लास्टिकचे साहित्य तयार करणाऱ्या एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास महादेव नगर कॅम्प नंबर ४ भागातील न्यू सिंध कंपाउंड भागातील प्लास्टिक कंपनीत घडली आहे. या घटनेत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जळून भस्मसात झाले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली आहे.
उल्हासनगरमध्ये प्लास्टिक कंपनीला भीषण आग; लाखोंचे साहित्य भस्मसात
उल्हासनगरमधील प्लास्टिक कंपनीमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीची माहिती मिळताच उल्हासनगर अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. हाटेच्या् सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशनम दलाच्या जवानांना यश आले. सध्या तरी जीवितहानीची कोणतीही माहिती समोर आली नाही.
उल्हासनगरमधील प्लास्टिक कंपनीमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीची माहिती मिळताच उल्हासनगर अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र मोठया प्रमाणात प्लास्टिकचा कच्चा माल आणि इतर साहित्य असल्याने आग आणखीनच वाढली. आगीने उग्ररूप धारण केल्याने कल्याण आणि अंबरनाथच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल होत्या. शर्थीच्या प्रयत्नानंतर आज (शनिवारी) पहाटेच्या् सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशनम दलाच्या जवानांना यश आले.
सध्या याठिकाणी कुलिंगचे काम सुरू आहेत. मात्र या भीषण आगीचे नेमकं कारण समजू शकलेले नाही. तर या भीषण आगीत कंपनीचे मोठ नुकसान झालं असून सध्या तरी जीवितहानीची कोणतीही माहिती समोर आली नाही.