ठाणे- भिवंडीत पुन्हा अग्नी तांडव पाहवयास मिळाले आहे. तालुक्यातील पूर्णा ग्रामपंचायत हद्दीमधील राजलक्ष्मी कॉम्प्लेक्समधील भंगार दुकानांना आग लागली. सोमवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास ही भीषण आग लागली. यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र, दुकान जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
भिवंडीत पुन्हा अग्नी तांडव.. हेही वाचा-केईम रुग्णालयातील 'त्या' व्हायरल व्हिडिओचा अहवाल आरोग्य विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांनी मागवला
भंगार गोदामाला लागलेल्या या भीषण आगीत पत्राशेडचे जवळपास 50 ते 60 दुकान जळून खाक झाले आहेत. या भंगार गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वस्तू, कागदी पुठ्ठा, टीव्ही, फ्रीज, कुलरचा टाकाऊ मटेरियल तसेच केमिकलचासाठा देखील साठवून ठेवण्यात आला होता. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळालेली नाही.
दरम्यान, ही आग विझविण्यासाठी भिवंडी, कल्याण व ठाणे येथील अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सुमारे ५ ते ८ तासाचा कालावधी लागणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.