ठाणे - मुंब्र्यातील खान कंपाऊंडमध्ये आज (मंगळवारी) भंगार गोदामात आग लागली. या आगीत येथील ६ गोदाम जळून खाक झाले आहेत. पहाटेच्या सुमारास लागलेल्या या आगीने बघता-बघता रौद्र रुप धारण केले होते. आग विझवण्यासाठी ठाणे आपत्ती व्यवस्थापन आणि ठाणे अग्नीशमन दलाचे जवान यांनी शर्थीचे प्रयत्न केले. ४ तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
मुंब्र्यातील खान कंपाऊंडमध्ये आग... सहा भंगार गोदाम भस्मसात - खान कंपाऊंड आग बातमी
घटनास्थळी कुलिंगचे काम सुरू असून लोखंड आणि प्लास्टिक मोठ्या प्रमाणात आगीत जळाल्याने कुलिंगसाठी वेळ लागणार आहे. ही आग विझवण्याकरता २ फायर इंजिन, २ पाण्याचे टॅंकर, १ जंबो वाॅटर टॅंकर, २ क्यूआरव्ही यांचा वापर केला गेला.
मुंब्र्यातील खान कंपाऊंडमध्ये आग..
घटनास्थळी कुलिंगचे काम सुरू असून लोखंड आणि प्लास्टिक मोठ्या प्रमाणात आगीत जळाल्याने कुलिंगसाठी वेळ लागणार आहे. ही आग विझवण्याकरता २ फायर इंजिन, २ पाण्याचे टॅंकर, १ जंबो वाॅटर टॅंकर, २ क्यूआरव्ही यांचा वापर केला गेला. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. या भागात अनेकदा अधा प्रकारे आग लागण्याचे प्रकार घडत असतात. या ठिकाणी आग लागण्या मागे भंगार व्यवसाय आणि शॉर्टसर्किट हे कारण सांगितले जाते.
Last Updated : Jul 21, 2020, 2:54 PM IST