ठाणे - भिवंडीतील सोनाळे ग्रामपंचायत क्षेत्रात एका कापड निर्मिती करणाऱ्या कंपनीला भर पावसात आग लागली. तीन मजली इमारतीला लागलेल्या या आगीत कोट्यवधी रुपयांची यंत्रसामुग्री, तयार कपडा व कच्चा माल जळून खाक झाला.
भिवंडीत कापड निर्मिती कंपनीला आग; कोट्यवधींचे नुकसान - भिवंडी लेटेस्ट आग न्यूज
सोनाळे ग्रामपंचायत क्षेत्रात श्री राजलक्ष्मी हायटेक पार्क येथे आहुजा सॅन फॅबब्रीक प्रायव्हेट लिमिटेड या अत्याधुनिक यंत्रमाग कापड निर्मिती करणाऱ्या कंपनीला पहाटे अचानक आग लागली. आग वेगात वाढत गेल्याने संपूर्ण तीन मजली इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. विशेष म्हणजे वरून पाऊस पडत असतानाही आग वेगात पसरली.
सोनाळे ग्रामपंचायत क्षेत्रात श्री राजलक्ष्मी हायटेक पार्क येथे आहुजा सॅन फॅबब्रीक प्रायव्हेट लिमिटेड या अत्याधुनिक यंत्रमाग कापड निर्मिती करणाऱ्या कंपनीला पहाटे अचानक आग लागली. आग वेगात वाढत गेल्याने संपूर्ण तीन मजली इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. विशेष म्हणजे वरून पाऊस पडत असतानाही आग वेगात पसरली. या आगीची माहिती मिळताच भिवंडी, कल्याण-डोंबिवली अग्निशामक दलाच्या एकूण चार गाड्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. सध्या या ठिकाणी कुलिंगचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.