ठाणे - वाघबीळ परिसरातील असलेल्या दिया मेडिकलला रात्री 11 च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. संबधित मेडिकल हे दिया मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे असून या हॉस्पिटलमध्ये 4 कोरोना रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. आग लागल्यानंतर त्यांना तत्काळ इतर रुग्णालयात हलविण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
ठाण्यात दिया मेडिकलला लागली आग... - दिया मेडिकल
वाघबीळ परिसरातील असलेल्या दिया मेडिकलला रात्री 11 च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या प्रकारात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
दिया मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
सुदैवाने या प्रकारात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पाच रुग्णवाहिकेच्या सहाय्याने रुग्णांना हलवण्यात आले होते. आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला आग मेडिकलला लागली होती. त्यानंतर 11 वाजून 5 मिनिटांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कॉल आल्यानंतर तत्काळ पालिकेचे टीम फायर इंजिन आणि क्यूक रिस्पॉन्स वाहन घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणली. दरम्यान, आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.