महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात इमारतीला आग; एकाच कुटुंबातील दोघांचा होरपळून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश - प्रणाली मढवी

Fire Break Out In Thane : घोडबंदर रोडवर असलेल्या इमारतीला आग लागून दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीतून तिघांना वाचवण्यात ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं. गंभीररित्या भाजलेल्या नागरिकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Fire Break Out In Thane
आग लागलेली इमारत

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 25, 2023, 12:10 PM IST

Updated : Nov 25, 2023, 12:29 PM IST

ठाणे Fire Break Out In Thane: इमारतीला लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तीन नागरिक गंभीर झाले आहेत. भाजल्यानं गंभीर झालेल्या नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अभिमन्यू मढवी (वय 60 वर्षे) आणि रमाबाई मढवी (वय 55 वर्षे) अशी आगीत होरपळून मृत झालेल्या नागरिकांची नावं आहेत. तर प्रणाली मढवी, कविश मढवी, पलाश मढवी या तिघांना वाचवण्यात यश आलं आहे.

दोन नागरिकांचा होरपळून मृत्यू :ठाण्यातील घोडबंदर रोड इथल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला आहे. या आगीत तीन नागरिक जखमी झाले आहेत. अभिमन्यू मढवी (60 वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर रमाबाई मढवी यांना बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना हिरानंदानी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केलं. तर प्रणाली मढवी, कविश मढवी, पलाश मढवी यांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याची माहिती ठाणे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

इमारतीच्या पहिल्या मजल्यावर लागली आग :घोडबंदर रोडवर असलेल्या वाघबीळमधील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आज पहाटे 3.20 ला आग लागली. या आगीची माहिती बाळकुम अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अभिमन्यू मढवी ( 60 वर्षे ) रमाबाई मढवी हे दोघे बेशुद्ध होते, तर तिघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढलं. यावेळी घटनास्थळी मुख्य अग्निशमन अधिकारी, कासारवडवली पोलीस ठाण्याच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्यात सहभाग घेतला. घटनास्थळावर अग्निशमन दलाचे दोन जवान आपल्या रेस्क्यू वाहनांसह तळ ठोकून होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना 4.50 ला यश आलं असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे.

हेही वाचा :

  1. भिवंडीत सार्वजनिक शौचालयाला भीषण आग; आगीत शौचालय जळून खाक
  2. ठाण्यात बांधकाम साईटवरील सॅम्पल प्लाटला लागली आग
  3. Furniture Market Fire Thane : फर्निचर मार्केटमधील इमारतीला भीषण आग; लाखाेच्या साहित्याची राखरांगोळी
Last Updated : Nov 25, 2023, 12:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details