ठाणे- डोंबिवली एमआयडीसी परिसरातील खंबाळपाडा भागात असलेल्या एका कंपनीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. शक्ती प्रोसिंग असे कंपनीचे नाव असून घटनास्थळी अग्निशमनच्या ४ गाड्या दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, ही आग कशामुळे लागली याचे नेमके कारण समजू शकलेले नाही तर आतापर्यंत या आगीत कुणालाही दुखापत झाली नसल्याचे वृत्त आहे.
डोंबिवली एमआयडीसीमधील कंपनीला भीषण आग - डोंबिवली एमआयडीसीत आग
शक्ती प्रोसिंग असे कंपनीचे नाव असून घटनास्थळी अग्निशमनच्या २ गाड्या दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, ही आग कशामुळे लागली याचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
कंपनीला आग लागताच आतील कामगार तातडीने बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. मात्र, आतापर्यंत या भीषण आगीत संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी आली आहे. कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगर महापालिका आणि एमआयडीसी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे आज शुक्रवार असल्याचे ही कंपनी बंद होती. त्यामुळे काही तांत्रिक दुरुस्तीचे काम सुरू होते. मात्र, काम सुरू असतानाच अचानक आग लागली. ही भीषण आग कशामुळे लागली याचे नेमके कारण समजू शकले नाही. आतापर्यंत या आगीत कुणालाही दुखापत झाली नसल्याचे वृत्त आहे.
कपड्यावर प्रक्रिया करणारी होती कंपनी
डोंबिवली खांबालपाडा परिसरात असलेल्या शक्ती प्रोसेस या कंपनीत कपड्यावर प्रक्रिया केली जाते. या कंपनीमध्ये कपड्याचा साठा मोठ्या प्रमाणात असून या कपड्याच्या साठ्याला अचानक आज सायंकाळच्या सुमारास आग लागल्याने आग पसरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र, आतापर्यंत कपड्याचा लाखोंचा साठा आणि मशीनरी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने आगीचे स्वरूप भीषण असल्याचे सांगण्यात आले.