महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडीत मोती कारखान्याला आग; कारखाना जळून खाक - ठाण्यात मोती कारखान्याला आग

आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असले तरी, आगीत तासाभरातच संपूर्ण मोती कारखाना जाळून खाक झाला. मात्र, सुदैवाने आगीची घटना कळताच कामगारांनी कारखान्याबाहेर पळ काढल्याने जीवितहानी टळली. मात्र, या आगीत यत्रांसह लाखोंचे प्लास्टिक दाणे जळून खाक झाले.

ठाणे
ठाणे

By

Published : Feb 10, 2021, 4:06 PM IST

ठाणे- भिवंडी शहरातील खाडीपार भागात असलेल्या मच्छा कंपाउंडमधील एका मोती कारखान्यात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असले तरी या आगीत तासाभरातच संपूर्ण मोती कारखाना जळून खाक झाला आहे. मात्र, सुदैवाने आगीची घटना कळताच कामगारांनी कारखान्याबाहेर पळ काढल्याने जीवितहानी टळली. मात्र, या आगीत यत्रांसह लाखोंचे प्लास्टिक दाणे जळून खाक झाले. भिवंडी महापालिका हद्दीत मोती कारखान्यांना बंदी असूनही हा कारखाना बेकायदा सुरू असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.

ठाणे

ज्वलनशील पदार्थांचा साठा असल्याने भीषण आगीचा भडका

भिवंडीत आगीचे सत्र थांबता थांबेना, आज पुन्हा दुपारच्या सुमाराला खाडीपार परिसरात असलेल्या मोती कारखान्याला आग लागली. या कारखान्यात रासायनिक ज्वलनशील पदार्थांचा साठा तसेच प्लास्टिक दाण्यांपासून मोती तयार करून ठेवलेल्या साठ्यामुळे काही क्षणातच कारखान्यात आग पसरून संपूर्ण कारखाना आगीत जळाला. विशेष म्हणजे मोती कारखान्यात सकाळच्या सत्रातील कामगार काम करीत होते. त्यावेळी या कारखान्याला अचानक आग लागली होती. आगीची घटना समजताच सर्व कामगारांनी कारखान्याबाहेर पळ काढला. त्यामुळे आगीच्या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. तर आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन जवानांनी दोन तास अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. सध्या याठिकाणी कुलींगचे काम सुरू असून आगीचे कारण अद्यापही समजू शकले नाही. या आगीत लाखों रुपयांचा मोत्यांचा साठा, यंत्रे जळाली. मात्र, या आगीमुळे परिसरातील नागरीवस्तीत धुराचे लोट पसरले होते.

भिवंडीतील अग्नी तांडव थांबणार कधी?

भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात नागरीवस्तीमध्ये बेकादेशीर मोती कारखाने आहेत. या गोदामांमध्ये अत्यंत ज्वलनशील असे अतिधोकादायक रसायने व साहित्य साठा केला जातो. या रासायनिक तसेच ज्वलनशील साठ्यांना वारंवार आगी लागण्याचे प्रकार घडत आहेत. चार वर्षांपूर्वीही याच परिसरातील एका मोती कारखान्याला आग लागून २ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यावेळी पालिका प्रशासनाने शहरातील मोती कारखाने बंद करण्याचे फर्मान काढून संबधित कारखाना मालकांना नोटिसी बजावल्या होत्या. मात्र, पालिकेची ती कारवाई कागदावरच राहिल्याचे दिसून आले. तर दोन वर्षांपूर्वी भिवंडी-ठाणे महामार्गावरील राहनाळ येथे लागलेल्या आगीत लाकडाच्या वखारीत झोपेत असलेल्या ६ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. तसेच गेल्यावर्षी फेब्रवारीमध्ये दापोडा येथे लागलेल्या आगीत ३ कामगार होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. भिवंडीतील यंत्रमाग कारखाने व गोदामांना वारंवार आगी लागण्याचे सत्र सुरू असताना आज मोती कारखान्याला लागलेल्या आगीच्या निमित्ताने भिवंडीतील अग्नी तांडव थांबणार कधी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details