ठाणे - शहरामध्ये कोव्हीड 19 चा सामना करण्यासाठी आणि कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी महपालिकेने खासगी रुग्णालये अधिगृहित केली आहेत. या खासगी रुग्णालयातील डॅाक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी संबंधित रुग्णालयांमध्ये कामावर उपस्थित न राहिल्याने संबंधित डॅाक्टर्स आणि इतर कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत. याकामी महापालिकेच्या तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
ठाणे शहरामध्ये कोरोनाचा सामना करता यावा आणि रूग्णांवर तातडीने उपचार करता यावेत, यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने अनेक खासगी रुग्णालये त्यामध्ये काम करणाऱ्या डॅाक्टर्स आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांसह अधिगृहित करण्यात आली आहेत. महापालिका प्रशासनाने यापूर्वी तसे आदेशही दिले आहेत.