महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोट्यवधींच्या घोटाळ्यात चौकशी सुरू असलेल्या अधिकाऱ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ

टिटवाळा रेल्वे रूळानजीक एका व्यक्तीचा मृतदेह १२ ऑक्टोबर रोजी मिळून आला होता. त्यावेळी लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणी आकस्मीत मृत्यूची नोंद करीत या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. या मृतदेहाची ओळख पटण्यासाठी त्यांनी मृतदेहाचे फोटो सगळीकडे सोशल मीडियावर व्हायरल केले होते. अखेर पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली.

ठाणे
ठाणे

By

Published : Oct 17, 2020, 8:19 PM IST

ठाणे - कोट्यवधींचा घोटाळा केल्याप्रकरणी ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू असलेल्या एका मोठ्या कंपनीतील अधिकाऱ्याचा टिटवाळानजीक रेल्वे रुळाजवळ मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सागर सुहास देशपांडे असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते ठाण्याला राहत होते. सागर हे ११ ऑक्टोबरला घरी सांगून गेले कि, मी टिटवाळा येथे जात आहे. मात्र, तेव्हापासूनच ते बेपत्ता होते. आता त्यांचा मृतदेह टिटवाळा नजीक रुळाजवळ आढळून आल्याने आत्महत्या, दुर्घटना की घातपात आहे. या तिहेरी अंगाने कल्याण लोहमार्ग पोलीस तपास करीत आहेत.

मृत सागर सुहास देशपांडे

टिटवाळा रेल्वे रूळानजीक एका व्यक्तीचा मृतदेह १२ ऑक्टोबर रोजी मिळून आला होता. त्यावेळी लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणी आकस्मीत मृत्यूची नोंद करीत या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. या मृतदेहाची ओळख पटण्यासाठी त्यांनी मृतदेहाचे फोटो सगळीकडे सोशल मीडियावर व्हायरल केले होते. अखेर पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली. ही व्यक्ती ठाण्याला राहत असून तिचे नाव सागर सुहास देशपांडे असे आहे. सागर हे एका मोठ्या कंपनीत अधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांची आर्थिक गुन्हे पोलिसांकडून चौकशी सुरू होती. ११ ऑक्टोबर रोजी ते टिटवाळ्याला जात असल्याचे त्यांनी त्यांच्या घरी सांगितले. ते तेव्हापासून घराबाहेर पडले, ते पुन्हा घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी ते बेपत्ता झाले असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविली होती. सहा दिवसांपासून नातेवाईक त्यांचा शोध घेत होते.

हेही वाचा -राजा प्रजेसोबत असायला हवा, आपला राजा तर कुटुंबात व्यग्र; रावसाहेब दानवेंची टीका

दरम्यान, कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मीक शादरूल यांनी दिलेल्या माहितीनुसार १२ ऑक्टोबरला रेल्वे रुळाजवळ एक मृतदेह आढळून आला. माहिती काढून शोध घेतली असता तो मृतदेह सागर देशपांडे यांचा आहे, हे स्पष्ट झाले. त्यांचा मृतदेह ज्या ठिकाणी आढळून आला. त्या ठिकाणापासून जवळपास दीड किलोमीटर अंतरावर त्यांचे चारचाकी वाहन निजर्नस्थळी आढळून आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details