नवी मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच महिन्यांपासून नवी मुंबई महापालिकेची उद्याने बंद ठेवण्यात आली होती. प्रशासनाने काही नियम व अटी घालून शहरातील उद्यानं सुरू केली आहेत. उद्यानात तुरळक नागरिक तोंडाला मास्क बांधून सोशल डिस्टन्सचे पालन करत वाॅकिंग करताना दिसत आहेत. मात्र, अडीच महिन्याच्या प्रदीर्घ कालावधीनंतर उद्याने सुरू झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवलेली उद्याने अखेर खुली...
कोरोनाच्या पार्श्वभूमी गेल्या अडीच महिन्यांपासून नवी मुंबई महापालिकेची उद्याने बंद ठेवण्यात आली होती. प्रशासनाने काही नियम व अटी घालून शहरातील उद्यानं सुरू केली आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्यानात फारशी गर्दी दिसत नसली तरी, सामाजिक अंतर राखून मास्क लावून, नागरीक लहान मुले उद्यानात येत आहेत. मार्च महिन्यापासून मुलं घरात बंदीस्त असल्याने चिडचिडी झाली असल्याचे काही पालकांनी सांगितले. मुलं निसर्गात, मोकळ्या वातावरणात पुन्हा खुलली आहेत असेही, काही पालकांनी सांगितले. सद्यस्थितीत उद्यान सुरु करण्यात आली असली, तरी उद्यानात येणाऱ्या नागरिकांनी तोंडाला मास्क बांधणे. वॉकिंग करताना सोशल डिस्टन्स ठेऊन चालणे हे नियम लागू केले आहेत. कोरोना होऊ नये यासाठी एकत्रित येऊन बाकड्यावर बसून गप्पा मारणे, योगासने, ओपन जिम, हास्य क्लबवर बंदी असल्याचे नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.