महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऑपरेटरच्या मृत्यूला कारणीभूत कंत्राटदाराच्या विरोधात 4 महिन्यानंतर गुन्हा दाखल - Thane latest news

डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मधील गुरूदेव टेक्स्क्रो डाईंग कंपनीत ऑपरेटरचे काम करताना, शिवम कृष्णाचंद मिश्रा याचा मृत्यू झाला होता. या ऑपरेटरच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कंत्राटदाराच्या विरोधात मानपाडा पोलिसांकडून 4 महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Filed an offense against the contractor
ऑपरेटरच्या मृत्यूला कारणीभूत कंत्राटदाराच्या विरोधात गुन्हा

By

Published : Nov 14, 2020, 8:21 PM IST

ठाणे -डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मधील गुरूदेव टेक्स्क्रो डाईंग कंपनीत ऑपरेटरचे काम करताना, शिवम कृष्णाचंद मिश्रा याचा मृत्यू झाला होता. या ऑपरेटरच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कंत्राटदाराच्या विरोधात मानपाडा पोलिसांनी 4 महिन्यांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक बापूसाहेब जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीच्या आधारे कंत्राटदार रामनारायण गुप्ता याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

गळ्यातील रुमालाने घात केला

डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मध्ये गुरूदेव टेक्स्क्रो डाईंग ही कापडावर प्रक्रिया करणारी कंपनी आहे. या कंपनीतील सोफर मशीन युनिटचे कंत्राट रामनारायण गुप्ता याच्याकडे आहे. सदर सोफर मशीनवर ऑपरेटर म्हणून शिवम मिश्रा हा 23 जुलै रोजी सकाळी 8 च्या सुमारास काम करत होता. इतक्यात ऑपरेटर शिवम याच्या गळ्यातील रुमाल मशीनच्या मेंगल रोलमध्ये अडकला आणि गळफास लागून त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू होता. शिवम हा मशीन ऑपरेट करत असताना तेथे देखरेख करण्यासाठी सुपरवायझरची नेमणूक करण्यात आली नव्हती. तसेच काम करताना ऑपरेटरने सैल कपडे परिधान करू नये, हा नियम असतानाही त्याबाबत काळजी घेण्यात आली नव्हती. तसेच पुरेसे मनुष्यबळ देखील पुरवण्यात आले नव्हते, या अशा अनेक घटना शिवमच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे तपासात समोर आले. दरम्यान या प्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून, त्याला अटक करण्यात आली.

या पूर्वीही अशीच घटना घडली होती

अशीच एक घटना त्याच महिन्यात घडली होती. ओमकार गुप्ता हा फेज 2 मध्ये असलेल्या नवजीवन डाईंग या कापडावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीत हेल्पर म्हणून नोकरी करत होता. 27 जुलै रोजी काम करत असतांना त्याचा तोल जाऊन तो तिसऱ्या माळ्यावरून खाली पडला. यात त्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची नोंद मानपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली. मात्र या प्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details