महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्चस्वाच्या वादातून तृतीयपंथीयांच्या दोन गटात राडा - ठाण्यात तृतीयपंथीयांच्या दोन गटात राडा

वर्चस्वाच्या वादातून तृतीयपंथीयांच्या दोन गटात झालेल्या राड्यात २ तृतीयपंथीयांवर चाकूने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तृतीयपंथीयांच्या दोन गटात राडा

By

Published : Nov 6, 2019, 12:13 PM IST

ठाणे- वर्चस्वाच्या वादातून तृतीयपंथीयांच्या दोन गटात झालेल्या राड्यात २ तृतीयपंथीयांवर चाकूने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तृतीयपंथी शिल्पा, हेमासह त्यांच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तृतीयपंथीयांच्या दोन गटात राडा

हेही वाचा -डोंबिवलीत अवतरले जाडजूड माकड; बच्चे कंपनीसह नागरिकांची पळापळ

काही दिवसांपूर्वी भिवंडीत तृतीयपंथीयांच्या दोन गटात शिष्य हिरावल्याने वाद झाला होता. याबाबत विठ्ठलवाडी येथे राहणारा तृतीयपंथी नीता केने आपल्या 15 ते 20 शिष्यांसोबत कल्याण पश्चिम, रोहिदास वाडा येथे राहणाऱ्या तृतीयपंथी शिल्पा व पूनम या दोघांच्या घरी बोलणी करण्यास गेले होते. यावेळी शांततेत बोलणी सुरू असताना तृतीयपंथी शिल्पाने मोठ्याने बोलण्यास सुरुवात करत वाद घातला. तसेच आसपासच्या लोकांना बोलावून तृतीयपंथी नीता यांच्यासह त्यांच्या शिष्यांना मारहाण केली.

हेही वाचा -पीएमसी बँक घोटाळ्याचा आणखी एक बळी, ठाण्यात खातेधारकाचा मृत्यू

याच दरम्यान एक अज्ञात व्यक्तीने तृतीयपंथी नीता व त्याचे शिष्य तृतीयपंथी रिजवाना यांच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तृतीयपंथी शिल्पा आणि हेमा यांच्यासह त्यांच्या दोन अज्ञात साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details