ठाणे - बांधकामाच्या क्षुल्लक वादातून दोन शिवसैनिकांमध्ये वाद झाल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी रात्री नितीन कंपनी जंक्शन सर्व्हिस रोडवर घडली. सुरेश टेंभे आणि कोंडू यादव असे या दोन शिवसैनिकांची नावे आहेत.
खासगी विकासकामांच्या ठेक्यावरून उद्भवलेल्या वादात यादव याने टेंभे याच्यावर हल्ला चढविला. बुधवारी रात्री नितीन कंपनी सर्व्हिस रोडवर मारहाणीचा प्रकार घडला. यात सुरेश टेंभे जखमी आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर कोंडू यादव याला रात्रीच नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. तर त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली.