महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांमध्ये रक्तरंजित राडा - shivsena

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अंबरनाथ शहरात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये रक्तरंजित राडा झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

जखमी कार्यकर्ते

By

Published : Mar 24, 2019, 3:33 PM IST

ठाणे- लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अंबरनाथ शहरात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये रक्तरंजित राडा झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या रक्तरंजित राड्यात ६ जण जखमी झाले असून यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दोन्ही गटातील काही कार्यकत्यांना अटक केली आहे.

जखमी कार्यकर्ते

मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ पूर्वेच्या महालक्ष्मीनगर परिसरात शिवसेनेचे नगरसेवक राजू शिर्के आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष महेश गोरे यांच्यात नगरपालिका निवडणुकीपासून वाद आहेत. शनिवारी रात्रीच्या सुमाराला पुन्हा निवडणुकीच्या वादातून दोन्ही गटात शाब्दिक चकमक होऊन दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांवर हत्यारांसह भिडले. यावेळी शिर्के गटाचे ५ जण जखमी झाले असून यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. तर महेश गोरे यांच्याही डोक्याला इजा झाली आहे.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे. आज चारही आरोपींना सुट्टीच्या विशेष न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून बाबाजी पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दोन्ही उमेदवारांनी युती, आघाडीच्या कार्यकत्यांच्या गाठीभेठी सुरु केल्या असतानाच, हा रक्तरंजित राडा घडल्याने पोलिसांसमोर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कार्यकत्यांना आळा घालण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details