ठाणे -जिल्ह्यातील कल्याण डोंबिवलीत दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढतच आहे. गेल्या २४ तासात नव्याने ५२ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. एकीकडे पावसाळ्याला सुरुवात होत असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ ही प्रशासनाकरता चिंतेची बाब ठरत आहे.
पावसाळ्याच्या तोंडावर चिंता वाढली; कल्याण डोंबिवलीत नव्याने ५२ कोरोनाबाधित - कोरोना अपडेट्स ठाणे
कल्याण डोंबिवलीत गेल्या २४ तासात ५२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर, रुग्णांची एकूण संख्या १ हजार ३२७ वर जाऊन पोहचली आहे. तर सध्याच्या स्थितीत ६६५ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
![पावसाळ्याच्या तोंडावर चिंता वाढली; कल्याण डोंबिवलीत नव्याने ५२ कोरोनाबाधित पावसाळ्याच्या तोंडावर चिंता वाढली](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-08:02-mh-tha-2-kdmc-1-photo-mh-10007-05062020192647-0506f-1591365407-955.jpg)
आजच्या रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेकडील चाळ परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. तर, रुग्णांची एकूण संख्या १ हजार ३२७ वर जाऊन पोहचली आहे. त्यापैकी आतापर्यंत ३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे ६२८ रुग्णांना आतापर्यत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्याच्या स्थितीत ६६५ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये २ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. दरम्यान, आज आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची विगतवारी पाहता डोंबिवली पूर्व आणि पश्चिममध्ये १०, कल्याण पश्चिममध्ये १५, टिटवाळा परिसरात २ आणि ग्रामीणमधील आंबिवली गावात २ रुग्ण आहेत. मात्र, कल्याण पूर्वेत रुग्णांच्या संख्येत लाक्षणीय वाढ झाली आहे. आजही यात २३ रुग्णांची भर पडली असून ऐन पावसाळ्याच्या तोंडावर वाढलेली रुग्णांची संख्या ही प्रशासनाची चिंता वाढवणारी असल्याचे दिसून येत आहे.