ठाणे -मागील दोन दिवसांपासून सतत सुरू असल्याने अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही. यातच मुंब्र्यातील एका गोडाऊनमध्ये पाणी शिरल्याने पाण्यात बुडून 15 बोकडांचा अंत झाला आहे. या गोडाऊनमध्ये 29 बकरे होते त्यातील 14 बकऱ्यांना वाचविण्यात यश आले आहे. यामुळे व्यापाऱ्यांचे सुमारे तीन ते चार लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी (दि. 18 जुलै) रात्री उशीरा घडली आहे.
बकरी ईदसाठी झाला होता बोकडांचा सौदा
बुधवारी (दि. 21 जुलै) होणाऱ्या बकरी ईदसाठी मोबम्मद फहाद या व्यापाऱ्याने बोकडं आणली होती. त्यांचा सौदाही रविवारी (दि. 18 जुलै) रात्री ठरला होता. सर्व ग्राहक सोमवारी (दि. 19 जुलै) सकाळी बकरे नेणार होते. तद्पूर्वी 29 बकरे मुंब्र्यातील एका गोडाऊनमध्ये ठेवण्यात आहे होते. मात्र, रविवारी रात्री मुसळधार झालेल्या पावसाचे पाणी गोडाऊनमध्ये शिरले. त्या पाण्यात बुडून 15 बोकडांचा दुर्दैवी अंत झाला तर 14 बोकडांना वाचविण्यात यश आले.