ठाणे- माणुसकीला आणि दातृत्वाला काळिमा फासणारे कृत्य मुंब्रा येथे घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मुंब्र्यातील रशीद कंपाऊंड येथील चर्नी पाडा परिसरात बापच मुलीवर कित्येक महिने बलात्कार करत असल्याचे उघडकीस आले असून धक्कादायक म्हणजे हा नराधम मुलीच्या गुप्तांगावर मेणबत्तीने चटके देऊन बलात्कार करत होता.
भाड्याच्या घरात मोईज बुटवाला हा 44 वर्षीय नराधम आपली पत्नी आणि सहा वर्षीय सावत्र मुलीसोबत राहत होता. मुलीची आई कामानिमित्त बाहेर जाताच मोईज हा पीडित मुलीला अमानुष मारहाण करून तिच्यावर पाशवी बलात्कार करत असे. पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देत असल्याने आपल्यासोबत जवळपास सहा महिने होत असलेले अमानुष कृत्य तिने कोणालाच सांगितले नाही. परंतु, या प्रकाराची माहिती परिसरातील स्त्रियांना कळताच त्यांनी पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिची समजूत काढली व घडत असलेला प्रकार विचारला. काही वेळाने धीर आल्याने सदर लहानगीने आपला सावत्र बाप आपले कसे शोषण करत होता याचा पाढाच वाचला.