महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हैवान बाप..! जेवताना लघुशंका केल्याच्या रागातून ६ वर्षाच्या मुलाला दिले चटके - लघुशंका केल्याच्या रागातून ६ वर्षाच्या मुलाला दिले चटके

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हैवान बापाला ताब्यात घेऊन त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करत अटक केली. उद्या (दि.०६ डिसें) त्याला न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहूराव साळवे यांनी दिली आहे.

ठाणे
ठाणे

By

Published : Dec 5, 2020, 8:44 PM IST

ठाणे- जेवताना लघुशंका केल्याच्या रागातून एका हैवान बापाने ६ वर्षीय मुलाला गरम चमच्याने पार्श्वभागावर आणि दोन्ही मांड्यावर चटके देऊन होरपळून जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण पूर्वेतील विजयनगर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून हैवान बापाला पोलिसांनी अटक केली आहे. सचिन कांबळे असे पोलिसांनी अटक केलेल्या हैवानाचे नाव आहे.

पीडित मुलाच्या आईचे निधन, आरोपीने केलाय तिसरा विवाह

आरोपी सचिन हा कल्याण पूर्वेतील विजयनगर परिसरात पत्नी व मुलांसह राहत असून तो मुंबई महापालिकेत कर्मचारी पदावर कार्यरत आहे. खळबळजनक बाब म्हणजे आरोपीला दोन बायका होत्या. त्यापैकी पीडित मुलाच्या आईचे निधन झाल्याने आरोपी सचिनने तिसरे लग्न केले. याच तिसऱ्या पत्नीसह मुलगा जेवण करीत असताना अचानक त्याने लघुशंका केली. याचाच हैवान बापाला राग येऊन त्याने गरम चमच्याने त्याच्या ढुंगणावर आणि दोन्ही मांड्यावर चटके दिले. या घटनेत पीडित मुलाचे ढुंगण आणि दोन्ही पायाच्या मांड्या होरपळल्या आहेत. जखमा झाल्याने त्याला उपचारासाठी महापालिकेच्या रुख्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हैवान बापाला ताब्यात घेऊन त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करत अटक केली. उद्या (दि.०६ डिसें) त्याला न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहूराव साळवे यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details