महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Fatal Attack On Married Couple : लग्न मोडल्याच्या रागातून विवाहित दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला; घटना cctv मध्ये कैद - फरमान शेखने तबस्सुम यांच्यावर चाकू हल्ला केला

लग्न मोडल्याच्या रागातून मुंब्रा येथे एका विवाहित दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. तुम मेरी नही, तो किसी कि नही हो सकती असे, म्हणत फरमान शेखने तबस्सुम यांच्यावर चाकू हल्ला केला आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलीस स्थानकात तक्रार दाखल असून आरोपीचा शोध सुरू आहे.

Fatal Attack On Married Couple
Fatal Attack On Married Couple

By

Published : Jul 25, 2023, 5:17 PM IST

विवाहित दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला

ठाणे :लग्न मोडल्याचा राग मनात धरून एका विवाहित दाम्पत्यावर सुऱ्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना मुंब्रा येथून समोर आल्याने खळबळ उडाली आहे. सदरचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून जखमी दाम्पत्याने मुंब्रा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. सध्या आरोपी फरार असून त्याचा शोध मुंब्रा पोलीस घेत आहेत.

लग्न करण्यास नकार :प्रेम तुटल्यावर पुरुषाचा अहंकार दुखावला जातो. त्यातूनच भयंकर गुन्हे घडतात. याचेच ताजे उदाहरण मुंब्र्यात पाहायला मिळाले. तबस्सुम शेख आणि आरोपी फरमान निसार शेख हे मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील अलिशान थिएटर इमारतीत राहत होते. त्यांच्या घरच्यांनी त्यांचे लग्नही ठरवले होते. पण आरोपी फरमान व्यसनी असल्याने तबस्सुमने त्याच्याशी लग्न करण्यास नकार देत लग्न मोडले.

तबस्सुमवर चाकू हल्ला : त्यानंतर मार्च २०२२ मध्ये तबस्सुमने इश्तियाक शेखसोबत लग्न केले, ज्यामुळे फरमानला राग आला होता. तो त्यावेळी काहीच करू शकला नाही. मात्र, जवळपास दीड वर्षानंतर 21 जुलै रोजी तबस्सुम तिच्या पतीसोबत तिचे आधारकार्ड काढण्यासाठी माहेरी आली. त्याचवेळी फरमानही तिथे आला. तबस्सुम "तुमने मेरे साथ शादी न करके बहुत बडी गलती कर दी है, अब देख मैं तेरे साथ क्या करता हूॅं" असे म्हणत तिच्यावर खिशातील चाकूने हल्ला केला.

आरोपी फरार :त्यानंतर बाहेर सुरू असलेला गोंधळ ऐकून घरात बसलेला तबस्सुमचा पती इशतीयाक धावत बाहेर आला. त्याने फरमानला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु संतापलेल्या फरमानने त्याच्यावरच चाकू हल्ला चढवत त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तू मेरी नही हुई तो, मैं तुझे और किसी की होने नही दूँगा, तुझे छोडूंगा नही, अशी धमकी देखील तबस्सुमला दिली. जखमी अवस्थेत घाबरलेल्या तबस्सुमसह तिच्या पतीने मुंब्रा पोलीस स्टेशन गाठून फरमान विरोधात फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून मुंब्रा पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपी फरमानचा शोध सुरु केला आहे. सदरची संपूर्ण घटना cctv मध्ये कैद झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा -Robbers Gang Arrested In Thane : दरोडा टाकण्याआधीच सहा दरोडेखोरांना फिल्मी स्टाईलने अटक

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details