ठाणे -गेली अनेक वर्षे कळवा रेल्वे स्थानका शेजारील रेल्वे मार्गालगत असलेल्या जमिनीवर अशी शरीराला घातक ठरणारी पालेभाजी तयार होत असून, ती ठाणे, कळवा, मुंबई, नवी मुंबई या ठिकाणी विकली जातात. या भाज्या पिकवण्यासाठी हेच दूषित पाणी वापरलं जाते. कारण भाज्या पिकविण्यासाठी पाणीच उपलब्ध नसल्याचं महिला शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अश्या नाल्याच्या पाण्यावर पिकवलेल्या भाज्या जर आपण खाल्या तर ते आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे. या पाण्यामुळे रासायनिक द्रव तयार होते. त्यामुळे लहान मुलांना अनेक आजर होऊ शकतात. खास करुन मेंदुचे आजार, त्याच बरोबर मोठ्या प्रमाणात पोटाचे आजर उद्भुवू शकतात. पचनक्रियेवर ही परिणाम होतात. पुढे जाऊन पोटाचा टीबी व कैंसर ही होऊ शकतो. त्यामुळे विशेषत: पावसात काळजी घेणे गरजेचे असून अश्या भाज्या खाण टाळले पाहिजे, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.
कळवा रेल्वे स्थानका शेजारील पटरीच्या बाजुच्या हे शौचालय आहे आणि याचच सांडपाणी व शेती शेजारी वाहणाऱ्या गटारातील दूषित पाणी या भाजीत प्रवेश करून ती खाणार्यांच्या शरीरात प्रवेश करते. त्यामुळेच अनेक नागरिकांना विविध पोटाचे आजार होतं आहेत. परंतु रेल्वे प्रशासन,अन्न आणि औषध प्रशासन आणि महापालिका प्रशासन याकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत आहे. मुंबई रेल्वे मार्गाच्या दुतर्फा असलेल्या 450 एकर खुल्या जागेवर ही भाजी तयार होत असून ती अत्यंत कमी भावात विकत घेऊन दसपट नफ्यात नागरिकांना विकण्यात येते, अशी माहिती स्थानिक रहिवासी राकेश पेडणेकर यांनी दिली. आपल्याच कर्मचाऱ्यांना ही जमीन कसण्यासाठी देण्यात आली असल्याची माहिती रेल्वे प्रशासन देत असली तरी या जमिनीवर काम करणारे परप्रांतीय असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून हे परप्रांतीय अशा सांडपाण्याच्या पाण्यावर पालेभाज्या पिकवून ठाणेकरांच्या जीवाशी खेळण्याचं काम करीत आहेत.
ही स्वस्त भाजी जाते देशभरात -ही नाल्याच्या दूषित पाण्यावर पिकलेली पालक हिरवा माठ लाल माठ भेंडी या भाज्या वाशी येथील एपीएमसी मार्केटमधे जाते आणि तेथून सर्व महाराष्ट्र भर जाते. त्यामुळे ही विषारी भाजी मोठ्या प्रमाणात सर्वत्र पोहचत असून यावर लागलीच कारवाई होणे गरजेचे आहे. अन्यथा लेड युक्त भाजी नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करणारे आहे.